संत तुकाराम अभंग - संग्रह २

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


पुढिल्याचें दुःख देखतसे ड...

पुढिल्याचें दुःख देखतसे डोळां । बळेंचि आंधळा होत आहे ॥१॥

न धरीच सोय मागील रहाटी । मनासवें कष्टी होत पुढें ॥२॥

गोरा वाडी जाय सुना धुंडी बिदी । सांगितली बुद्धि नायकेचि ॥३॥

बळें फाडी गांड घाली धसावरी । मग चुरमुरी दुःख होतां ॥४॥

तुका म्हणे ज्याची बुद्धि असे कुडी । हेत धडधडी शुद्ध कैंची ॥५॥