संत तुकाराम अभंग - संग्रह २

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


अंतरीं निर्मळ वाचेचा रसाळ...

अंतरीं निर्मळ वाचेचा रसाळ । त्याचे गळां माळ असो नसो ॥१॥

आत्मअनुभवीं चोखाळिल्या वाटा । त्याचे माथां जटा असो नसो ॥२॥

परस्त्रीचे ठायीं जो कां नपूंसक । त्याचे अंगा राख असो नसो ॥३॥

परद्रव्या अंध निंदेसी जो मुका । तोचि संत देखा तुका म्हणे ॥४॥