संत तुकाराम अभंग - संग्रह २

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


संकल्पा विकल्पा द्यावी ति...

संकल्पा विकल्पा द्यावी तिळांजुळी । सुखें वनमाळी आठवावा ॥१॥

आणिक तूं कांहीं न करीं विचार । राहीं निरंतर समाधानें ॥२॥

मनासी विक्षेप उठे जरी नाना । भाकावी करुणा जीवें भावें ॥३॥

तुका म्हणे पडे स्वरुपासी मिठी । मग पाठीं पोटीं आत्माराम ॥४॥