कथा भगवंताची सार । सकळ तीर्थांचें माहेर ॥१॥
गंगा यमुना सरस्वती । कृष्णा वेण्या भागीरथी ॥२॥
सेतुबंध वाराणशी । पुण्यलाभ हरिकथेसी ॥३॥
तुका म्हणे संतसंग । सदा कथेचा प्रसंग ॥४॥