अजामीळ भिल्लि तारिली कुंटिणी । प्रत्यक्ष पुराणीं वंद्य होय ॥१॥
नीचाचे जातीचा उंच वंद्य होय । श्रीहरीचे गाय गुणानुवाद ॥२॥
त्याची निंदा करी त्याची कुष्टबुद्धि । मुख संवदणी रजकाची ॥३॥
तुका म्हणे येथें भजन प्रमाण । काय थोरपण जाळावें तें ॥४॥