संत तुकाराम अभंग - संग्रह २

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


हरिजागरासी । कां रे जातां...

हरिजागरासी । कां रे जातांना मरसी ॥१॥

कोठें पाहशील तुटी । आयुष्य वेंचे उठाउठी ॥२॥

तुज आहे ज्यांची गुंती । ते तों मोकलिती अंतीं ॥३॥

तुका म्हणे खरा । लाभ विचारीं तूं बरा ॥४॥