संत तुकाराम अभंग - संग्रह २

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


राउळासी जातां लाजसी गव्हा...

राउळासी जातां लाजसी गव्हारा । दासीच्या मंदिरा पुष्पें नेसी ॥१॥

दांत करी काळे मिशां भरी पीळ । फिरवितो डोळे हल्या जैसा ॥२॥

वांकडी पगडी पायपोसा गोंडे । दासीमागें हिंडे सर्व काळ ॥३॥

तुका म्हणे ऐसे असती जे कां लंड । ह्मणुनि फोडी तोंड यम त्यांचें ॥४॥