संत तुकाराम अभंग - संग्रह २

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


करोनियां स्नान झालासे सों...

करोनियां स्नान झालासे सोंवळा । अंतरींच्या मळा विसरला ॥१॥

उदकांत काय थोडे ते पाषाण । जाताती धुवोन अखंडता ॥२॥

फुटोनियां निघे अंतरीं कोरडा । पाणी तया जडा काय करी ॥३॥

तुका म्हणे नाहीं हरीसी शोधिलें । त्याचें सर्व केलें व्यर्थ जाय ॥४॥