संत तुकाराम अभंग - संग्रह २

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


डोळां भरे धूर । धनसंपत्ति...

डोळां भरे धूर । धनसंपत्ति वेव्हार ॥१॥

अंगीं जाणिवेचा ताठा । घाली वयसेचा जेठा ॥२॥

डोळां पातलें पटळ । दृष्टी झालीसे बेंबळ ॥३॥

तुका म्हणे भरे । अंगीं मदाचें कीं वारें ॥४॥