संत तुकाराम अभंग - संग्रह २

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


अवचित लावी अग्न । विषदान ...

अवचित लावी अग्न । विषदान मोलाचें ॥१॥

वुत्ति हरी बलात्कारें । खोटें खरें न पाहे ॥२॥

रवरव कुंभिपाक । भयानक अघोर ॥३॥

दुःख भोगी बहुकाळ । तो चांडाळ कुळेंसी ॥४॥

सुटलीया वांयां जाय । बधिर होय पांगुळा ॥५॥

जीव नाहीं हात खुळे । फुटले डोळे गर्भांध ॥६॥

तेज नाहीं अंगकांती । अंगीं वहाती दुर्गंधी ॥७॥

तुका म्हणे केला सांठा । बुद्धि फांटा दोषांचा ॥८॥