संत तुकाराम अभंग - संग्रह २

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


गुरु मागतसे धन । शिष्य बो...

गुरु मागतसे धन । शिष्य बोले दटावून ॥१॥

कां हा मंत्र तुम्ही दिला । बलात्कार मज केला ॥२॥

पुरे तुझें गुरुपण । मंत्र घ्यावा परतोन ॥३॥

तुका म्हणे दोघेजण । गेले अज्ञानें बुडोन ॥४॥