संत तुकाराम अभंग - संग्रह २

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


तीर्थें केलीं व्रतें केली...

तीर्थें केलीं व्रतें केलीं । चित्तीं वासना राहिली ॥१॥

पृथ्वींतले देव केले । चित्त स्थिर नाहीं झालें ॥२॥

नग्न मौनी जटाधारी । राख लाविली शरीरीं ॥३॥

करी पंचाग्निसाधन । ठेवी मस्तकीं तो प्राण ॥४॥

नर होउनि पशु झाले । तुका म्हणे वायां गेले ॥५॥