संत तुकाराम अभंग - संग्रह २

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


धणी करी शेत चारा चरे पक्ष...

धणी करी शेत चारा चरे पक्षी । टोला लागे वृक्षीं हकनाक ॥१॥

हात करी चोरी टोले पाठीवरी । दोष हा पदरीं संगतीचा ॥२॥

तुका म्हणे ऐसे दुष्टाचे संगता । गेले अधोगति भले भले ॥३॥