लोकां सांगे ब्रम्हज्ञान । आपण कोरडा पाषाण ॥१॥
तेणें ज्ञान कां सांगावें । ज्ञानासारिखें वर्तावें ॥२॥
नित्य वाची ज्ञानेश्वरी । दारीं भिकार्यासी मारी ॥३॥
तुका म्हणे ऐसे लंड । आम्ही देखिले उदंड ॥४॥