संत तुकाराम अभंग - संग्रह २

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


पिता सांगे पुत्रापाशीं । ...

पिता सांगे पुत्रापाशीं । नको जाऊं पंढरीसी ॥१॥

तेथें आहे एक भूत । भूतें झडपिले बहुत ॥२॥

भूतें झडपिलें नारदा । धुरु आणि गा प्रल्हादा ॥३॥

भूत गोकुळासी गेलें । भूतें गोपाळ झडपिले ॥४॥

भूत पंढरीस आलें । भूतें पुंडलिका गोविलें ॥५॥

तुका सांगे जन्म जागो । भूत जन्मोजन्मीं लागो ॥६॥