संत तुकाराम अभंग - संग्रह ३

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग


नायकावे कानीं तयाचे ते बो...

नायकावे कानीं तयाचे ते बोल । भक्तीवीण फोल ज्ञान सांगे ॥१॥

वाखाणी अद्वैत भक्तिभावेंवीण । दुःख पावे शीण श्रोतावक्ता ॥२॥

अहंब्रम्ह वाणी चाळवितो तोंडा । न बोलावें भांडा तयासवें ॥३॥

देखें बहिर्लंट करितां पाखंड । तुका म्हणे तोंड काळें त्याचें ॥४॥