संत तुकाराम अभंग - संग्रह ३

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग


मखरा लाउनी बेगड । आंत मां...

मखरा लाउनी बेगड । आंत मांडोनि दगड ॥१॥

हातीं घेउनियां टाळ । घाली वाचेचा गोंधळ ॥२॥

काय केलें रांडपोरा । वर्म चुकलासी गव्हारा ॥३॥

तुका म्हणे खोटें । तुझें कपाळ करंटें ॥४॥