आवडीचा हेवा सांगतों मी देवा । दोन पात्रें ठेवा आम्हापाशीं ॥१॥
तुम्हापाशीं तैशी ठेवावीं निरुतीं । सारुन आइतीं भोजनाची ॥२॥
रागा आले देव म्हणती हा वेडा । तुका म्हणें पुढां कळईल ॥३॥