जोडोनियां कर । उभा राहिलों समोर ॥१॥
एकाविण एका । वेचें मोल होतें फुका ॥२॥
काळिमेनें राती । दिवस कळा आली होती ॥३॥
उंचनीच गारा । हिरा परीस मोहरा ॥४॥
विषें दाविलें अमृत । कडू गोड घात हित ॥५॥
तुका म्हणे भले । तैसे नष्टानें दाविले ॥६॥