संत तुकाराम अभंग - संग्रह ३

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग


आम्ही गोंधळी गोंधळी । गोव...

आम्ही गोंधळी गोंधळी । गोविंद गोपाळांच्या मेळी ॥१॥

आमुचा घालावा गोंधळ । वाजवूं हरिनामीं संभळ ॥२॥

दहा पांचा घाला जेवूं । आम्ही गोंधळाला येऊं ॥३॥

कामक्रोध बकरे मारा । पुजा रखुमादेवीवरा ॥४॥

जेथें विठोबाचें देऊळ । तेथें तुकयाचा गोंधळ ॥५॥