संत तुकाराम अभंग - संग्रह ३

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग


स्वप्न सांगे मंडोदरी । लं...

स्वप्न सांगे मंडोदरी । लंका वेढिली वानरीं ॥१॥

दूत पातले रामाचे । बळ अधिक हनुमंताचें ॥२॥

एक एका दुर्गावरी । उडया मारिती नानापरी ॥३॥

तुका म्हणे स्वामी माझा । आला अयोध्येचा राजा ॥४॥