संत तुकाराम अभंग - संग्रह ३

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग


नमन माझें गुरुराया । महार...

नमन माझें गुरुराया । महाराजा दत्तात्रया ॥१॥

तुझी अवधूत मूर्ति । माझ्या जिवाची विश्रांति ॥२॥

जीवाचें सांकडें । कोण उगवील कोडें ॥३॥

अनसूयासुता । तुका म्हणे पाव आतां ॥४॥