संत तुकाराम अभंग - संग्रह ३

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग


धन्य धन्य देवी गीता । आदि...

धन्य धन्य देवी गीता । आदिमाया वेदमाता ।

जाणेल जो अर्था । धन्य मातापितर ॥१॥

एक श्लोक अथवा चरण । अर्थ अनुभव अंगीं लेण ।

भवमोक्षाचें साधन । नलगे कोठें शोधावें ॥२॥

एका चरणाचा अर्थ । राजा जनक जाणत ।

मग विदेहाची मात । अंगीं येउनि ठसावी ॥३॥

एका चरणाचा अर्थ । मुनि वसिष्ठ जाणत ।

शांतीच्या सदनांत । निजशयनीं पहुडला ॥४॥

एका चरणाच अर्थ । पंडुपुत्र धर्म जाणत ।

सत्य भाषण यथार्थ । शत्रुमित्र समान ॥५॥

अर्जुन नरनारायण । हे तों सिद्ध साधक जाण ।

दुष्ट करावया निर्दंळण । तुका म्हणे अवतरले ॥६॥