संत तुकाराम अभंग - संग्रह ३

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग


खेळ ग फुगडी फुगडी । नको ...

खेळ ग फुगडी फुगडी । नको जाऊं तूं रडी ॥ध्रु०॥

फुगडी खेळ गे तूं पिंगा । आलिस माझ्या संगा ।

फुगडी खेळ रे श्रीरंगा । सोडुनि धांगडधिंगा ॥१॥

फुगडी खेळ गे फेराची । हो बाईल दिराची ।

लज्जा सांड गे मनाची । गांवच्या लोकांची ॥२॥

फुगडी खेळ गे लखोटा । धर माझा अंगोठा ।

बळकट घाल गे कांसोटा । सोडुन चारी वाटा ॥३॥

फुगडी खेळ गे शिवशक्ति । हरिनामाची भक्ति ।

तुकया स्वानंद गर्जती। पदोपदींच्या कीर्ति ॥५॥