नाम गाईन मी कथा । निजरंगीं नाचेन आतां ॥१॥
तुझ्या नामाचा विश्वास । आम्हां कैंचा गर्भवास ॥२॥
तुझ्या नामीं विसर पडे । तरी कोटि हत्या घडे ॥३॥
नाम कोणी घ्या रे फुका । भावें विनवी दास तुका ॥४॥