जाणें येणें हे उपाधि । ऐसी मानी माझी बुद्धि ॥१॥
म्हणुनी स्थिरावलें मन । करुनी राहिलों चिंतन ॥२॥
जीवभाव सांगों । काय सांडूं काय मागों ॥३॥
तुका म्हणे जी दातारा । तुझ्या पायीं मज थारा ॥४॥