संत तुकाराम अभंग - संग्रह ३

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग


प्रेमपान्हा आणि सदा सर्वक...

प्रेमपान्हा आणि सदा सर्वकाळ । दृष्टि हे निर्मळ अमृताची ॥१॥

भूक तहान दुःख वाटों नेदी शीण । अंतरींचे गुण जाणोनियां ॥२॥

आशा तृष्णा माया चिंता धाडी दुरी । ठाव आम्हा करी खेळावया ॥३॥

तुका म्हणे जी दातारा । तुझ्या पायीं मज थारा ॥४॥