संत तुकाराम अभंग - संग्रह ३

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग


ब्रम्हांडनायक त्याचा मी अ...

ब्रम्हांडनायक त्याचा मी अंकित । काय यमदूत करिल माझें ॥१॥

वेश्या जया नामें तरली गणिका । अजामिळासारिखा पापराशी ॥२॥

चरणाचा महिमा अहिल्या उद्धरिली । रुपवंती केली कुब्जा क्षणें ॥३॥

पृथिवी तारिली पाताळासी जातां । तुका म्हणे आतां आम्ही किती ॥४॥