संत तुकाराम अभंग - संग्रह ३

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग


स्वमुखें जी तुम्ही सांगा ...

स्वमुखें जी तुम्ही सांगा मज सेवा । ऐसे माझे देवा मनोरथ ॥१॥

नेघों कांहीं आम्ही आपुल्या उदरा । चित्त वित्त घर जीवावरी ॥२॥

बोलों परस्परें वाढवावें सुख । पहावें श्रीमुख डोळेभरी ॥३॥

तुका म्हणे सत्य बोलतों वचन । करुनियां चरण साक्ष तुझे ॥४॥