संत तुकाराम अभंग - संग्रह ३

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग


तुज नाम नाहीं । तरी माझें...

तुज नाम नाहीं । तरी माझें सांग काई ॥१॥

आतां बोल संतांपुढें । वाद सांगेन निवाडे ॥२॥

तुज रुप नाहीं । तरी माझें दावीं कांहीं ॥३॥

अमर तूं खरा । नव्हें कैसा मी दातारा ॥४॥

खेळसी तूं लीला । तेथें मी काय निराळा ॥५॥

साच तूं लटिका । तैसा मीही म्हणे तुका ॥६॥