आतां जागें रे भाई जागें रे । चोर निजेल्या नाडुन भागे रे ॥१॥
ऐसें ठाउकें असोन नेणा । दुःख पावाल पुढिले पेणां ॥२॥
आतां नका रे भाई नका रे । आहे गांठीं तें लुटवूं लोका रे ॥३॥
तुका म्हणे एकाच्या घायें । कां रे जाणोनि न धरा भये ॥४॥