संत तुकाराम अभंग - संग्रह ३

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग


पहुडविले जन मन झालें निश्...

पहुडविले जन मन झालें निश्चळ । चुकवुना कोल्हाळ आला तुका ॥१॥

पर्यंकीं निद्रा करावें शयन । रखुमाई आपण समवेत ॥२॥

घेउनियां आलों हातीं टाळविणा । सेवेसी चरणा स्वामीचिया ॥३॥

तुका म्हणे आतां परिसावीं सादरें । बोबडीं उत्तरें पांडुरंगें ॥४॥