संत तुकाराम अभंग - संग्रह ३

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग


जियावें हीनपणें । कासयाच्...

जियावें हीनपणें । कासयाच्या प्रयोजनें ॥१॥

प्रारब्धीं संसार । वरी हिमातीची थार ॥२॥

होणार तें कांहीं । येथें अवकळा नाहीं ॥३॥

तुका म्हणे देवें । कृपा केलिया बरवें ॥४॥