संत तुकाराम अभंग - संग्रह ३

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग


जे या धाले ब्रह्मानंदें ।...

जे या धाले ब्रह्मानंदें । आम्हा सोय त्यांची पदें ।

संतांच्या संवादें । मथैल तें नवनीत ॥१॥

याचकासी कष्ट नाहीं । वेळ राखोनियां राही ।

भोजनसमयीं । होइल एकी ॥२॥

विश्वास हे उपासना । भांडवल आम्हां दीना ।

सर्व शक्ति कुंठीत ॥३॥

तुका म्हणे वर्म । मागणें तें प्रेम । आम्हा भिक्षा उद्देश ॥४॥