लेवविला तैसा शोभे अलंकार । केला तैसा थोर लहानही ॥१॥
गोवी पडों नेदी अधिकारा ऐसी । गुणाची हे रासी पांडुरंग ॥२॥
जाणत्या जाणता नेणत्या सारिखा । न दिसे पारिखा जिवाहुनी ॥३॥
तुका ह्मणे पाहे चिंतनाची वाट । मग घाली नीट धांव नेटें ॥४॥