सकळ कल्याण तूं माझे अंतरीं । अगा विटेवरी ठाकलिया ॥१॥
माझ्या मायबापा सखया पांडुरंगा । लवकरी येगा वाट पाहें ॥२॥
तीर्थ तुळसीदळ औषध पाचन । अंतरीं जीवन पाय तुझे ॥३॥
तुका म्हणे तूं या भक्तांची माउली । कृपेची साउली करीं मज ॥४॥