संत तुकाराम अभंग - संग्रह ३

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग


पहुडले जन विवळली राती । च...

पहुडले जन विवळली राती । चुकले पुढती कल्होळासी ॥१॥

तुम्हा रंजवितों आपुलिया चाडे । गायें नाचें पुढें आवडीनें ॥२॥

तुम्हालागीं आम्ही जागवूं बळेंचि । केली क्षमा त्याची पाहिजे त्वां ॥३॥

तुका म्हणे तूं बा दयाळू कोंवसा । सेल दिल्ही दासा सद्‌भक्तीची ॥४॥