संत तुकाराम अभंग - संग्रह ३

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग


पाहिजे तें आतां प्रमाण प्...

पाहिजे तें आतां प्रमाण प्रत्यक्ष । आली यातें साक्ष खरी खोटी ॥१॥

ठेवियली खूण करुनी संकेत । तयासी संचित लागलेंसे ॥२॥

जाणसी गे माते लेंकरांची चाड । नये पडों आट निष्ठुरता ॥३॥

तुका म्हणे आम्ही करावें वचन । तुम्ही जें जतन कराल तें ॥४॥