संत तुकाराम अभंग - संग्रह ४

संत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.


संत तुकाराम - देईं गा विठोबा प्रेमाचें ...

देईं गा विठोबा प्रेमाचें भातुकें । सर्वां कवतुकें सान थोरां ॥१॥

असो नसो भाव आलों तुझ्या ठाया । पाहें केशीराया कृपादृष्टी ॥२॥

जैसी ज्याचे मनीं आवडी जाणसी । द्यावें हें आम्हासी धणीवरी ॥३॥

तुका म्हणे तुझीं वेडीं हीं वांकुडीं । नामें पाश तोडीं आपुलिया ॥४॥