संत तुकाराम अभंग - संग्रह ४

संत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.


संत तुकाराम - तुम्ही असाल ते असा । आम्ह...

तुम्ही असाल ते असा । आम्हा सहसा निवडेना ॥१॥

अनुसरों एकचित्तें । हारोहातें गिंवशीत ॥२॥

गुणदोष कशासाठीं । तुझे पोटीं वागवूं ॥३॥

तुका म्हणे दुजें आतां । कोठें चित्ता आतळों ॥४॥