संत तुकाराम अभंग - संग्रह ४

संत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.


संत तुकाराम - काय तुज म्या कैसें हें जा...

काय तुज म्या कैसें हें जाणावें । अनुभवा आणावें कैशा परी ॥१॥

सगुण कीं निर्गुण स्थूल कीं लहान । न कळे अनुमान मज तुझें ॥२॥

कोण तो निर्धार करुं हा विचार । भवसिंधु पार तरावया ॥३॥

तुझे पाय मज कैसे आतुडतो । न पडे श्रीपति वर्म ठावें ॥४॥

तुका म्हणे माझा फेडावा हा पांग । शरणागता सांग वर्म आतां ॥५॥