संत तुकाराम अभंग - संग्रह ४

संत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.


संत तुकाराम - एक एक कर्म लाउनियां अंगीं...

एक एक कर्म लाउनियां अंगीं । ठेवितो प्रसंगीं सांभाळीन ॥१॥

नको बा रे तुम्ही वाव बहु फार । धरोनी अंतर ठायाठाव ॥२॥

वेव्हार ते आले समानचि होते । बळ नाहीं येथें चालों येत ॥३॥

तुका म्हणे आतां निवाडाचे साठीं । संवसार तुटी त्याग केलों ॥४॥