संत तुकाराम अभंग - संग्रह ४

संत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.


संत तुकाराम - माझियेच वेळे घेतली कां खो...

माझियेच वेळे घेतली कां खोळ । झालासी केवळ अबोलणा ॥१॥

लपविलें रुप ने देखें नयनीं । पाळिसी चोरुनी चराचर ॥२॥

अन्यायाचा राग न कळे मानसीं । तरी न बोलसी विठ्ठला रे ॥३॥

रोगेजोनी तरी बोलें नारायणा । लागतों चरणा तुका म्हणे ॥४॥