एकचि मागणें देईं तुझी गोडी । न लगे आवडी आणिकांची ॥१॥
तुझें नाम गुण वर्णीन पवाडे । आवडीच्या कोडें नाचेन रंगीं ॥२॥
बापा पांडुरंगा हेंचि देईं दान । जोडती चरण जेणें तुझें ॥३॥
आवडीसारखे मागितलें तरी । तुका म्हणे करीं समाधान ॥४॥