संत तुकाराम अभंग - संग्रह ४

संत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.


संत तुकाराम - नव्हों नरनारी संसारा आतलो...

नव्हों नरनारी संसारा आतलों । निर्लज्ज निष्काम जनीं वेगळेच ठेलों ॥१॥

चाल रघुरामा आपुलिया ग्रामा । तुजवीण आम्हा कोण सुख सांगाती ॥ध्रु०॥

जनवाद लोकनिंदा पिसुणाचें चोरें । साहीं तुजसाठीं अंतरलीं सहोदरें ॥२॥

बहुतां हातीं हा निरोप पाठविला तुज । तुका म्हणे फुका सांडुनियां लोकलाज ॥३॥