सतत मानसीं करितों विचार । तों हें अनावर विषयलोभी ॥१॥
आतां मज राखें आपुलिया बळें । न देखें हें जाळें उगवितां ॥२॥
सांपडलों गळीं नाहीं त्याची सत्ता । उगळी मागुता घेतला तो ॥३॥
तुका म्हणे मी तों अज्ञानचि आहें । जरी तुम्ही साहे नव्हां देवा ॥४॥