संत तुकाराम अभंग - संग्रह ४

संत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.


संत तुकाराम - मरण नेणें माया धांवोनी वि...

मरण नेणें माया धांवोनी विरसें । जीवित्व ना बाळसें आली रया ॥१॥

आमिसें मीनु लागला गळीं । अभक्ष्य तो गिळी म्हणुनियां ॥२॥

काढोनी बाहेरी प्राण घेऊं पाहे । तेथें कोण बाप माय रया ॥३॥

गोडपणासी गुंतली माशी । सांपडे फांशीं अधिकाधिक ॥४॥

तुका म्हणे प्राण घेतला आशा । धांवे हृषीकेशा मायबापा ॥५॥