माझें चित्त तुझे चरणीं । तुझें रुप माझे मनीं ॥१॥
सांपडलों एकमेकां । जन्मोजन्मीं नव्हे सुटका ॥२॥
माझें चित्त तुमचे पायीं । तुमचें चित्त आणिके ठायीं ॥३॥
त्वां बा तोडिली माझी माया । मी बा जडलों तुझ्या पाया ॥४॥
तुका म्हणे बळी । जीव दिला पायातळीं ॥५॥