संत तुकाराम अभंग - संग्रह ४

संत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.


संत तुकाराम - आतां तुज गाऊं ओविये मंगळी...

आतां तुज गाऊं ओविये मंगळीं । करुं गदारोळीं हरिकथा ॥१॥

होसी निवारिता आमुचें सकळ । भय तळमळ पापपुण्य ॥२॥

भोगिले ते भोग लावूं तुझे अंगीं । अलिप्त या जगीं होउनि राहूं ॥३॥

तुका म्हणे आम्ही लाडकीं लेंकुरें । न राहों अंतरें पायांवीण ॥४॥