झाली होती काया । बहुत मलीन पंढरिराया ॥१॥
तुमच्या उजळली नामें । चित्त प्रक्षाळिलें प्रेमें ॥२॥
अनुतापें झाला झाडा । प्रारब्धानें केला तोडा ॥३॥
तुका म्हणे देह पायीं । ठेवुनि झालों उतराई ॥४॥